Sunday, September 18, 2005

पांडू

पांडू

जरी कावळा, कैसा तोंडी मोती धरला?
उसने घेउनि तुरे पिसारे पांडू सजला!

जाइल तेथे भेटे वरचढ, जरि हिरमुसला,
संगत मिळता अर्धवटांची, पुन्हा बहरला

तर्कसंगती युक्तिवाद जेंव्हा ना जमला,
त्वरे कुणाच्या पदराखाली जाउनि लपला

विनोद करता केविलवाणा, कुणी न हसले,
आव आणता सुज्ञपणाचा तोही फसला

अर्धवटाने का शिकवावे ज्ञान जगाला?
कर्तृत्वाने नाही नुसता बोलुनि थकला

जरी जमेना मजेत जगणे कलंदराचे,
सोंग काढले शिष्टपणाचे, करतो नकला

बुडती येथे राजहंस अन् बदके बगळे
'वजना'विन हा 'हलका' पांडू अलगद तरला!

शशांक जोशी

1 Comments:

At 11:54 AM, Anonymous Anonymous said...

perfect for me
i m complete looser
great poem!!

 

Post a Comment

<< Home