Friday, January 20, 2006

विंडोज़ मध्ये देवनागरी

विंडोज़ मध्ये देवनागरी

बराहा बरोबर येणारे "बराहा डायरेक्ट" नावाचे एक हत्यार वापरून कुटेही देवनागरी लिहिण्याची सोय आहे.

पायऱ्या अश्या
  1. बराहा इन्स्टॉल केल्यावर, बराहा डायरेक्टच्या आयकन वर टिचकी (एक किंवा दोन, चवीनुसार;) मारा
  2. संगणक फलकाच्या खालील-उजव्या कोपऱ्यात (जिथे सामान्यतः घड्याळ असते) बराहा डायरेक्ट चे चिह्न दिसेल.
  3. F12 कळ दाबली असता खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे "बराहा डायरेक्ट युटिलिटी" ची खिडकी उघडेल.
  4. त्यात "इंडियन लँग्वेज" आणि "आउटपुट फॉरमॅट" निवडा.
  5. आता ओपनऑफिस रायटर (किंवा वर्ड, किंवा कोणतीही युनिकोड ओळखणारी प्रणाली) ची खिडकी उघडून थेट मराठीत लिहायला सुरू करा!
  6. F11 कळ दाबल्याने होईल इंग्लिश-मराठी उड्या मारता येतील
  7. खाली दिलेले चित्र पाहा.


  8. माझ्याकडील विंडोज डब्यावर भारतीय भाषासंच इंस्टॉल नाही त्यामुळे नोटपॅड मध्ये जोडाक्षरे, वेलांट्या बरोबर दिसत नाहीत. पण ओपनऑफिस मध्ये अगदी आरामात मराठीत लिहू आणि सुरक्षित करू शकतो.

चला तर मग. वापरा आणि कळवा.

आपला,
(प्रयोगशील) शशांक


लिनक्स मध्ये देवनागरी? शून्य - एक संगणकीय कविता पाहा :)

.

3 Comments:

At 9:10 AM, Blogger Vishal K said...

शशांकराव,

दुव्याबद्दल धन्यवाद. बरहा मी वापरुन पाहिलेले नाही. कधीतरी वापरुन पाहीन. विंडोजच्या कळफलकाची इतकी सवय झाली आहे की आता इतर कळफलकावर टाईप करताना अडखळायला होतं. एक प्रश्न आहे. बरहा वापरुन गुगल निरोप्यावर थेट मराठीत लिहीता येतं की दुस-या ठिकाणी लिहून चिकटवावं लागतं? सवडीने उत्तर दिलेत तरी चालेल.

ब-याच दिवसांनंतर तुमच्या ब्लॉगवर काहीतरी वाचून बरे वाटले. 'समग्र शशांक जोशी' चा उपक्रम चांगला आहे. 'साहित्यविषयक महत्वाकांक्षा' ही येउ द्या त्यावर.

 
At 6:59 PM, Blogger Nandan said...

शशांक, तुमचा हा लेख मराठीत ज्यांना लिहायची इच्छा आहे, परंतु कसे टंकलेखन करावे हे माहीत नाही त्यांना अतिशय उपयुक्त ठरेल. एक सूचना म्हणजे, हाच लेख जर तुम्ही इंग्रजीमध्येसुद्धा लिहिलात तर ज्यांच्या browser वर मराठी वाचता येत नाही, त्यांनासुद्धा वाचता येईल.

नंदन

 
At 5:22 AM, Anonymous Anonymous said...

विशालराव
"बराहा डायरेक्ट" वापरून गुगल निरोप्यावर थेट लिहिता येतं एवढच नव्हे तर अन्य ठिकाणी देखील
वापरता येतं. हा आत्ताचा मजकूरही मी बराहा डायरेक्टवर थेट टाईप केला आहे.

 

Post a Comment

<< Home