Tuesday, September 27, 2005

लता

मराठी

१. सुंदर ते ध्यान

२. जय देव जय देव जय जय शिवराया (तीन गाणी जोडून आहेत त्यातले दुसरे. गीताचे बोल (सहाव्या ओळीपासून))- शिवकल्याण राजा (या ध्वनिफीतीतील सर्वच गाणी अप्रतिम आहेत)

३. पसायदान

४. अरे अरे ज्ञाना झालासी पावन

५. मालवून टाक दीप (या दुव्यावरील ध्वनिमुद्रणाचा दर्जा तितका चांगला नाही)


हिंदी

१. किसीने अपना बनाके मुझको - पतिता (१९५३)

२. है इसी मे प्यार की आबरू - अनपढ (१९६२) (हा दुवा थेट गाण्याचा नाही, या दुव्यावर दिसणाऱ्या यादीतून हे गाणे निवडावे लागेल)

३. नैनोमे बदरा छाएं - मेरा साया (१९६६)

४. बैयां ना धरो - दस्तक (१९७०)

५. ये कहाँ आ गये हम - सिलसिला (१९८१)

Sunday, September 18, 2005

पांडू

पांडू

जरी कावळा, कैसा तोंडी मोती धरला?
उसने घेउनि तुरे पिसारे पांडू सजला!

जाइल तेथे भेटे वरचढ, जरि हिरमुसला,
संगत मिळता अर्धवटांची, पुन्हा बहरला

तर्कसंगती युक्तिवाद जेंव्हा ना जमला,
त्वरे कुणाच्या पदराखाली जाउनि लपला

विनोद करता केविलवाणा, कुणी न हसले,
आव आणता सुज्ञपणाचा तोही फसला

अर्धवटाने का शिकवावे ज्ञान जगाला?
कर्तृत्वाने नाही नुसता बोलुनि थकला

जरी जमेना मजेत जगणे कलंदराचे,
सोंग काढले शिष्टपणाचे, करतो नकला

बुडती येथे राजहंस अन् बदके बगळे
'वजना'विन हा 'हलका' पांडू अलगद तरला!

शशांक जोशी