Thursday, February 02, 2006

काही गोष्टी काही धडे

जीवनात कन्फ्रंटेशन आणि कॉन्फ्लिक्ट्स यांना तोंड द्यावेच लागते हे जरी खरे असले तरी, कधीकधी यांना तोंड फोडावे पण लागते! बहुतेकांचा (माझाही) कल शक्यतो क्न्फ्रंटेशन टाळण्याकडे असतो. असे का?
  1. "समोरच्या व्यक्तीला वाइट वाटेल, त्यापेक्षा आपणच थोडी गैरसोय सहन करावी" असा विचार करून आपण बऱ्याचदा दुसऱ्याची चूक असूनही आणि आपल्यावर/इतरांवर अन्याय होत असतानाही आपण तोंड उघडत नाही.
  2. असे करण्याने समोरची व्यक्ती दुखावली जाईल. द्वेष, सूडभावना वाढेल आणि भविष्यात आपण अडचणीत असताना आपल्याला मदत मिळणार नाही.

हे जरी खरे असले तरी कन्फ्रंटेशनला पर्याय नाही. अन्यथा आपल्याला न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या, आणि अन्यायकारक गोष्टी चुपचाप स्वीकारण्याची पाळी येते.

तेंव्हा "कन्फ्रंटेशन टाळू नये, शांतपणे आणि विचारपूर्वक त्याला सामोरे जावे!" (हा माझ्यासाठी धडा!)

असो ....

इथे येऊन एक वर्ष झाले. गेल्या वर्षात काय कमावले आणि काय गमावले याचा आढावा कधीतरी निवांत बसून घ्यावा असा विचार आहे. योग्य वाटल्यास त्याचा अहवाल ब्लॉगात येईलच.


कॉलेज सोडल्यापासून प्रत्येक फेब्रुवारी महिना नेहमी नाट्यमय घटना आणि स्थित्यंतरे घेऊन आला आहे. पण यंदा त्याची कृपादृष्टी दिसत नाही. कुणास ठाऊक? अजून, २६ दिवस आहेत. पाहू काय होते ते.

.

4 Comments:

At 9:22 PM, Blogger Sumedha said...

कंफ़्रंटेशन टाळू नये, त्याला शांतपणे तोंड द्यावे, हे अगदी बरोबर. कारण तेव्हढ्यापुरते ते टाळाणे सुखावह वाटले, तरी पुढचा विचार करता हानीकारक होण्याचा धोका अधिक असतो. आपल्याला न आवडणार्‍या, न पटणार्‍या गोष्टी आपण कु्ठपर्यंत स्वीकारायच्या याची मर्यादा घालणे आवश्यक असते. ती घालणे हे कधी कधी अवघड काम होउन बसते. अशा वेळी दूरदृष्टी वापरली की सोपे होउ शकते!

माझे "2 पैसे!"

 
At 6:15 AM, Blogger shashank said...

सुमेधा,

>> तेव्हढ्यापुरते ते टाळाणे सुखावह वाटले, तरी
>> पुढचा विचार करता हानीकारक होण्याचा धोका
>> अधिक असतो.

खरे आहे

तुझ्या दोन पैश्यांबद्दल धन्यवाद! :)

शशांक

 
At 5:15 PM, Blogger Prashant M Desai said...

प्रत्येक गोष्ट बोलून न दाखवता संयम दाखवला तर, कधी कधी नंतर समजते की आपण बोलणार होतो ते चुक होतं. त्यामुळे "झाकली मुठ सव्वा लाखाची" सारखं मुठ झाकलेलीच ठेवावी. या गोष्टीचे अनेक फायदे आहेत.

 
At 4:18 AM, Blogger shashank said...

लाख रुपयेकी बात ;)

 

Post a Comment

<< Home